पाककृती - पंचरस आमटी

साहित्य -

  • एक वाटी तुरीची डाळ
  • चार कच्ची केळी
  • एक लहान वांगे 
  • एक बटाटा
  • एक लहान मुळा
  • एक वाटी काजू 
  • ओल्या खोबऱ्याचे एक वाटी काप
  • एक कांदा 
  • दोन चमचे धने
  • एक चमचा जिरे
  • लहान लिंबाएवढी चिंच 
  • थोडा गूळ 
  • मीठ चवीप्रमाणे
  • ओले खोवलेले खोबरे एक वाटी
  • फोडणीचे साहित्य
  • एक - दोन सुक्या मिरच्या
  • पाच सहा ओल्या मिरच्यांचे तुकडे
  • एक चमचा गोडा मसाला.


कृती - डाळ शिजवून घ्यावी. केळी, बटाटा, वांगे आणि मुळा ह्यांच्या फोडी करून सर्व शिजवून घ्याव्यात. नंतर फोडणी करुन त्यात चिरलेला कांदा टाकून लालसर परतावा. त्यावरच काजू व खोबऱ्याचे काप घालावे. नंतर त्यावर शिजवलेली डाळ व शिजवलेल्या भाज्या टाकून हवे असेल तेवढे पाणी घालावे. ओले खोवलेले खोबरे, जिरे, सुकी मिरची व चिंच हे सर्व वाटून आमटीत घालावे. चवीप्रमाणे मीठ व गूळ घालावा. ओल्या मिरच्यांचे तुकडे व गोडा मसाला घालून उकळी आणावी. चविष्ट पंचरस आमटी तयार!


- श्रद्धा मेस्त्री


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा