कविता - मैत्रीण

तुझी माझी ओळख फार जुनी नाही, 
पण गाठ भेट अगदी आत्ताचीही नाही।।
कधी कधी मैत्रीसाठी आयुष्य अपुरं पडतं,
कधी कधी क्षणात नातं हे जडतं।।
बघता क्षणी वाटून जातं आपल्या मनात,
हेच तर क्षण राहून जातात ध्यानात।।
जन्मभर पुरेल प्रेम असं मिळतं, 
वळणावळणावर नातं नवं हे जुळतं।।
मायेच्या आठवणीत ती ही येते, 
मनाला आपल्या दिलासा देऊन जाते।।
प्रत्येक वेळेस बोलताना नवं काही कळतं, 
हळूहळू मनामध्ये मैत्रीचं नातं जुळतं।।
तुझं ते बोलणं, समजावणं हवहवसं वाटतं, 
सोडून जाण्याच्या कल्पनेने मन हे दाटतं।।
ज्ञानेश्वरी वाचतांना कोडं तुला पडायचं,
विचारांची श्रृंखला सतत ते जोडायचं।।
मंथनाचं मंथन खरंच तू केलस, 
विचारांच्या चाकोरीतून बाहेर तू नेलसं।।
तुझी स्तुती करण्यास शब्द माझे अपुरे, 
आठवणींनी तुझ्या वाजतील नुपूरे।।
दूर तू जातेस पण ठेव आठवण सखे, 
राहू दे स्मरणात आम्ही तुझ्यासारखे।।


- नंदिनी नागपूरकर


1 टिप्पणी: