दाम करी काम देवा

मनी नाही राम
पण खिशात आहे दाम
देवाच्या द्वारी हुद्दयाला सलाम
सत्य, अहिंसा बापूंची
शस्त्रे होती खरी,
आताच्या जगात
तसबिरीतच ती बरी … दाम करी काम देवा

साधा सरळ माणूस
गरजांनी व्यापलेला,
बेईमानीच्या दुनियेत
इमानदारीने झुकलेला
जीवनावश्यक गरजांची
यादी तशी छोटी,
पण स्टेटसच्या नादात
चढाओढ मोठी …. दाम करी काम देवा

सरकार कुणाचं कोणतं
याला किंमत नाही उरली
सत्तेच्या दुनियेत
तत्त्व नाही पुरली
नोटेवरचे बापू
गेले घरोघरी
वजनावरच ठरते
त्यांची किंमत खरी … दाम करी काम देवा

नंदिनी धाकतोड नागपूरकर 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा