नाती गोती

जगातलं पहिलं आणि खरं नातं ते आईचं,
तिच्यामुळेच तर आपलं अस्तित्व, म्हणून लाख मोलाचं.

आठवण येते आई-बाबांच्या निःस्वार्थी प्रेमाची,
कधीच परतफेड न करता येणाऱ्या त्या ऋणाची.

मग भाऊ, बहिण, काका, मावशी, नवरा, मुलं, नातवंड, किती तरी नाती,
ही सगळी मिळून आपलं आयुष्य समृद्ध करून टाकती.

कुठे प्रेमाचा ओलावा, तर कुठे आशीर्वादांचा खजिना,
आयुष्य किती लवकर पुढे जातं, सगळी नाती निभावताना.

नवरा-बायकोचं नातं म्हणजे दोन चाकं संसाररुपी रथाची
शब्दच अपुरे पडतात, अशी किमया ह्या नात्याची.

राग, लोभ, मोह, माया, मान, अपमान हे सर्व नात्यांमुळे,
जर नातीच नसती, तर भावनांनाही नसती पाळेमुळे.

काही नातेवाईक हवेहवेसे वाटतात,
कारण नात्यापेक्षा जास्त त्यांच्याशी मैत्रीचे संबंध असतात.

मैत्रीचं नातं सगळ्यात उच्च आणि निर्मळ,
त्यातल्या भावनांमध्ये नाही जराही भेसळ.

मुलांशी आपलं नातं असतं खास,
त्यांना भेटायची मनाला नेहमीच आस,

ती छकुली मोठी होतात,
आणि आपली बेस्ट फ्रेंड बनून जातात.

नातवंडं तर साय दुधावरची,
त्या नात्याला सरच नाही कशाची.

नात्यांचे असे विविध कंगोरे,
नात्यांविना जीवन अधुरे, जीवन अधुरे.

- मेघना असेरकर


 

४ टिप्पण्या: