मन

सांगु काय तुजला....मन हे विचित्र आहे,
मारे भरारी जेथे....तूजलाच फक्त पाहे,
डोळ्यापुढे सदाच राणी... तूझेच चित्र राही,
मनही असेच वेडे.....दूसरा विचारच नाही. 

आठवणीत तुझ्या....राहे सदा मी दंग,
जीवनात म्हणुनी आहे... वेगळाच एक रंग,
ह्रदयी सदाच माझ्या....आहे तूझेच स्थान,
बोलणे तुझे ते गोड....आतुर ऐकण्या कान. 

नसशी जिथे जिथे तू ...सगळेच भासे व्यर्थ,
जीवनात तूझ्याविना...ऊरेल काय अर्थ,
ठाऊक नसे तूला गं...किती तू आहेस खास,
नसता तू जवळ...वाटे कसे ऊदास. 

आहेस तूच माझी ...जाणीवही पुरेशी,
माझीच तू राहशी... स्वप्न हेच ऊराशी. 

- सतीश सप्रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा