- कवितेस … -

कधी वाटते तुझी चाहूल लागलीये 
वळून पहावे तर तिथे तू नसतेसच … 
तिथे असतात कधी हलणारी झाडाची पाने 
कधी पानांवर खेळणारे उन्हाचे कवडसे 
कधी पावसाचे चुकार चुटपुटते थेंब 
तर कधी उमललेले लाघट चंद्रबिंब …
ते पाहून परत मनात वळावे 
तर तिथे तू येऊन गेल्याच्या पाऊलखूणा
आणि परत एकदा हुकलेला भेटीचा क्षण 
- वृंदा टिळक

४ टिप्पण्या: