वसुधे तुझ्याचसाठी

वसुधाच माझी आहे माता
सूर्यनारायण तर साक्षात पिता
चराचरावर सत्ता आता
अस्तित्वावर का घाला आता

डायनासोर तर आले गेले
हिमयुग अवतरले ओसरले
विश्वतापाचे युग पाचरले
हरितक्रांतीचे ब्रिद न आचरले

पुढच्या लेकरांनी जर विचारले
आनंदवन भुवनी का न व्यापले
वाघ सिहांना तुम्हीच तर मारले
कित्येकांना लुप्ततेवर आणले

इतके करूनही न का भागले
सुनामी रोग राईचे भोग भोगले
अनेक ह्यातून जगले मेले
शिक्षेनंतरही का न उमजले

शहाणा हो तर आता
या जगाचा तूच हो त्राता
हरित वस्त्राने सुखवेल माता
कृपा करेल निरंतर जगत्पिता

- मृणाल देशपांडे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा