अंगणातल्या तारेवर येणार्या पक्ष्यांसारखी ...
काही माणसे किलबिलत येतात,
आनंदाने झोके घेत विसावतात !
चिवचिवणारे दोन शब्द बोलून,
पंख फुलवत उडून जातात !
मागे वळून पाहिले तर,
दरवळणारी एक वाट भेटते !
तिच्यावरचे सुगंधित कण वेचून,
माझी रिक्त झोळी भरुन जाते !
- यशवंत काकड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा