आज पुसट पुसट
भासे जीवनाची वाट
जणु मृगजळ असे
मिरवित खोटा थाट !
शब्द नसे ओठांवर
थरथरती सारे स्वर
मनी दाटले सागर
डोळे पाण्याचेच घर !
विचाराया असे सोपे
असे समजाया जड
आज संपत का नाही
हा वेदनांचा गड !
बघ पाऊले चालती
आज मनाला सोडून
भोळे मनही थांबते
सारे बंधन तोडून!
ठेच लागते जीवास
होई जीव कासावीस
गूढ रुजती ते घाव
देई त्रास आत्म्यास !
कर संकटांना ठार
कर दुःखांवर वार
झेल अलगद सारे
दे ना स्वतःला आधार !!
Apratim Mugdha!
उत्तर द्याहटवाDhanyawad, Meenal!
उत्तर द्याहटवाawesome, proud of you Mugdha !!
उत्तर द्याहटवाखुप छानं...
उत्तर द्याहटवाsundar ga!!
उत्तर द्याहटवाAprateem mugdha.. Sahi..
उत्तर द्याहटवाkhup mast..
उत्तर द्याहटवाMasta
उत्तर द्याहटवा