तू आणि मी

तू सूर.. मी ताल
तू राग.. मी ख्याल
तू श्वास.. मी हवा
तू वीज.. मी दिवा
तू फूल.. मी गंध
तू नाद ..मी छंद
तू पाऊस.. मी ऊन
तू लय.. मी धून
तू आत्मा..मी शरीर
तू पाणी.. मी विहीर
तू गळा.. मी आवाज
तू दागिना.. मी साज
तू धडकन.. मी ह्रदय
तू तेज ..मी वलय
तू ध्यान.. मी भक्ती
तू प्राण.. मी शक्ती
तू सागर.. मी लाट
तू नदी.. मी काठ
तू प्रवाह.. मी पाणी
तू शब्द.. मी वाणी
तू हीर.. मी रांझा
तू पतंग.. मी मांजा
तू वृक्ष.. मी छाया
तू शरीर.. मी काया


- सतीश सप्रे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा