पावसाची आली सर

पावसाची आली सर
घालूनिया कोडे
उत्तरांची वाढे झार
गुन्तवीत तिढे

येई सरीवर सर
पागोळ्या गळती
दाटलेली सांज होई
उनाड धरती

अशी कोसळता सर
मन अनावर
नभ उतरुनी डोळा
सांडे काठावर

बरसली अशी सर
गूढ चित्रलिपी
जन्मावरी गोंदलेली
प्राक्तनाची नक्षी

- वृंदा टिळक

२ टिप्पण्या:

  1. मनावर पाऊसाचे गारुड अनेकदा भिजूनही कायम असते! ही चित्रलिपी कवीने म्हटल्याप्रमाणे खरंच गूढ आहे. कारण, ती प्रत्येक फराट्यामधून वेगवेगळे अर्थ उमटवीत असते!

    उत्तर द्याहटवा