- निवांत -

सुख, शांती अन आनंद
मिळवण्या धावे मानव जन्मभर
परि असती ते तयाचे मनात
तशीच एक तृष्णा निवांत

जीवन चाले भरधाव गतीने
निवांत क्षण तयास न मिळे
तगमग होतसे जीवास फार
परि शोधितो जीवनात निवांत
मानसिक एक तृष्णा निवांत

निवांत शोधी पशु अन विहंग
मजेत टिपती वा विहरती नभात
रवंथ करिती गुरे निवांतात
कसा मिळतो तयांना निवांत ?
मानसिक एक तृष्णा निवांत

शमवून अपुल्या तप्त किरणांना
रवि जातसे अस्त चलाला
जणू अवनीच्या कुशीत लपून
शोधितो तो पण निवांत
मानसिक एक तृष्णा निवांत

धिक्कार असो, असल्या जिण्याचा
असे ,चिंता अन भवतापच नुसता
न मिळती क्षण निवांताचे
ते कसले जिणे निरर्थकाचे?
मानसिक एक तृष्णा निवांत

मिळवावा लागतो पळ निवांत
पहाया बदल सृष्टीचे नव नित
बदलते रंग मेघांचे नभाते
सुचते गीत निवांताचे
मानसिक एक तृष्णा निवांत
- विनोदिनी वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा