वडा-पाव, Cutting Chai, मुंबई मुंबई !

क्रिकेट पाहण्याची आवड मला लहानपणापासून आहे. Boxing Day Test Match, Ashes, Benson & Hedges Cup, World Cup इत्यादी जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल तरी सकाळी उठून किंवा रात्री जागून आवर्जून TV वर बघायचे. तसं आमचं पूर्ण घरच क्रिकेटवेडं होतं म्हणा. आमच्या घरी पहिला TV आला तो World Cup १९८३ च्या मुहूर्तावर. आणि final च्या वेळी तर आजोबांनी चक्क देवच पाण्यात ठेवले होते - ह्यापुढे कपिल देवची काय बिशाद – आणावाच लागला जिंकून World Cup :). इतर तरुण मुलींच्या कपाटात film stars चे फोटो लावलेले असत, तेव्हा माझ्या कपाटात Steve & Mark Waugh होते.

World Cup चे वेळापत्रक चिकटवणे, ते नियमितपणे update करणे, हे सगळे प्रकार आवडीने केले, अजूनही करते :) Mecca of Cricket मानल्या जाणाऱ्या Lords Cricket Ground ची वारीदेखील करून आले. पण live cricket match पाहण्याचा योग काही आला नाही.

आणि इतक्या वर्षानंतर IPL २०१८ मध्ये live match बघायची संधी मिळाली आणि ती पण कुठली तर IPL २०१८ ची बहुचर्चित चुरस - Mumbai Indians Vs Chennai Super Kings . इथे एका गोष्टीची नोंद करणं गरजेचं आहे - माझं cricket प्रेम मी माझ्या मुलांकडे pass on केलंय . क्रिकेट च्या सर्व प्रकारांमध्ये त्यांची रुची IPL मध्ये जास्त आहे. IPL चे संघ, खेळाडू, statistics ह्यांची त्यांना इत्यंभूत खबर आहे. त्यामुळे मुलांना match साठी नेण्याची मजा काही वेगळीच होती. Match ला जायचं ठरवल्यानंतर आधी तिकिटं मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले आणि त्याच बरोबर अनेक प्रश्न उभे राहिले - खूप गर्दी असेल का, गरम होईल का, NRI मुलांना सोसेल का... इत्यादी इत्यादी. पण मला ही संधी गमवायची नव्हती त्यामुळे गाडी, घोडा इत्यादीचा बंदोबस्त केला, Mumbai Indians चे मस्त T-shirts वगैरे घेतले आणि निघालो match पाहायला.

वानखेडे stadium मध्ये पाऊल टाकताच शरीरावर एक शहारा उमटला. प्रत्यक्ष ठिकाणी पोचल्यावर आधी वाटणारे सगळे संदेह, धाकधूक कुठच्या कुठे पळून गेली. गर्दीचे नियोजन करण्यासाठी असणारे स्वयंसेवक, कुठलाही थिल्लरपणा न करता केवळ match चा आनंद लुटणारे हजारो प्रेक्षक आणि वातावरणातील विलक्षण उर्जा यांमुळे तनामनात उत्साह संचारला. मग काय , पुढचे ४ तास मी पण मुलांबरोबर लहान झाले . IPL चं signature music वाजलं की ओरडणे, mic वर वडा-पाव, Cutting chai...

म्हटलं कि मुंबई मुबई म्हणून वाक्य पूर्ण करणे, Mexican wave चा भाग होणे... मज्जाच मजा! Test cricket आणि २०-२० यापैकी काय श्रेष्ठ हा न संपणारा वाद असला तरी मला स्वतःला IPL बद्दल विशेष कौतुक वाटतं. विराट कोहली आणि AB de Villiers एकाच वेळेला crease वर असणं , १८-२० वर्षांच्या पृथ्वी शॉ , मयंक मार्कंडेय, शिवम मावी सारख्या नवोदित खेळाडूंना थेट सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग , जॅक कॅलिस , VVS लक्ष्मण ह्या सारख्या दिग्गजांकडून मार्गदर्शन मिळणं, विकेट घेतल्यावर DJ Bravo आणि प्रदीप छाजरचं नाचणं - ज्ञानाची आणि अनुभवाची केवढी तरी देवाण घेवाण, स्पर्धेबरोबर क्रिकेटच्या खेळाचा आनंद मनमुराद लुटणं...! नवोदित स्थानिक खेळाडूंना IPL त्यांच्या गुणवत्तेचं प्रदर्शन करण्याची बहुमूल्य संधी प्राप्त करून देतं. जसप्रीत बुमराह , युजवेंद्र चहल सारख्या खेळाडूंनी IPL मधूनच भारतीय क्रिकेट संघात प्रवेश केला. IPL ची अजून एक गंमत म्हणजे किती ही team following वगरे म्हटलं तरी काही खेळाडू असे आहेत की ते समोर आल्यावर आपण कुठल्या संघाला support करतोय हे विसरायला होतं. आम्ही पाहिलेल्या match मध्ये हे अनुभवायला मिळालं . स्टेडियम होतं वानखेडे, शहर होतं मुंबई, team होती Mumbai Indians. पण सगळ्यात जास्त टाळ्या, शिट्या ज्याच्यासाठी वाजल्या, ज्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर बसवलं तो खेळाडू म्हणजे
Captain Cool M S Dhoni! वानखेडेच्या electronic board वर झळकलं – Thalaivar is back !

Live cricket match चा अनुभव नवीन होता आणि तो अविस्मरणीय ठरला!!

- अस्मिता तडवळकर


1 टिप्पणी: