- आधे-अधूरे -

( उर्दु नझ्म आणि त्याचा मराठी भावानुवाद) 

उर्दु नझ्म

बुरबुराते शरारती झरनों की मासुमियत 
या खिलखिलाती हरियाली की तबस्सुम 
समिंदर तरन्नुम गाता, फिरभी गुमसुम
बदसूरत न बना फ़िज़ूल, गज़लोमें ढाल इन्हे | 

झुर्रीयोंमें दबी सुष्क आंखें, खोजती शबाब
शगाफोंसे लदा चरगाह, ताकते फ़व्वार
दर्यामे आवाराह कश्ती, तलाश साहिल की
बदसूरत न बना फ़िज़ूल, गज़लोमें ढाल इन्हे |

संकल्पना कहो, या नजारे तखय्युल 
नज़म शेरोशायरी निरे लफ़्ज है कोरे
कबसे अल्फ़ाज़ खुद बन गये इतिहास?
शायर क्या पहनायेगा जिंदगी को लिबास |

जिंदगी गर हकीकत है, नज्में खयाली पुलाव
जिंदगी गोश्त, कंकाल, शायरी दिखाऊ खाल
दर्द, ख़ुशी, जुनून, आरजू, मोहब्बती मिठास
शाहीर क्या पहनायेगा जिंदगी को लिबास | 

मराठी भावानुवाद

खळखळते ओहोळ, हास्य निरागस
हिरवीकंच कुरणे, निर्व्याज, लोभस 
समुद्र गंभीर गाज, कधी मुकेपणाने
हे जीवन नक्कीच करपणार, गजलेने! 

सुरकुत्यांत गडले डोळे, तारुण्याचा शोध
तडकलेले माळरान, ओलाव्याचा अनुरोध
समुद्रांत बारकी होडी, किनारा दिसेना 
हे जीवन नक्कीच करपणार, गजलेने! 

काव्य- संकल्पना असो वा कल्पना मस्त
काव्य, शायरी, सारे कोरे शब्दच फक्त!
अक्षरे स्वत:ला मानू लागली इतीहास?
कवडे काय चढवणार जीवनाला पोशाख!

जीवन हकीगत आहे, काव्य मनाचे मांडे
जीवन अस्थी मांस, कविता दिखाऊ झेंडे
सुख दु:ख, आकांक्षा, शुद्धप्रेमाची मिठास,
कवडे काय चढवणार जीवनाला पोशाख! 
- अरुण मनोहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा